ट्रकची ट्रेलरला धडक : ट्रक चालक जागीच ठार - येनापूर नजीक घडली घटना
प्रतिनिधी / आष्टी : चामोर्शी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक व ट्रेलर च्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना येनापूर नजीकच्या चित्तरंजनपूर येथे २८ ऑगस्ट सोमवारी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.

माहितीनुसार मयूर अलोने (२४) रा. सोमनपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतक ट्रक ड्रायव्हर चे नाव आहे. तो शासकीय अन्नपूरठा करणाऱ्या गडचिरोली येथील ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवर वाहनचालक होता. येनापूर कडून चामोर्शी कडे जाणारे अन्नपुरवठा करणारा ट्रक क्रमांक MH ३४ AV ०१९८ या वाहनाने वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक MH ४० CM २८८५ या वाहनाच्या च्या उजव्या बाजूला मध्यभागी जोरदार धडक दिली. यात ट्रक चालक मयूर अलोने हा जागीच ठार झाला असून ट्रकचा दर्शनी भाग चेंदामेंदा झाला आहे. यात ट्रेलर चे कोणतेही नुकसान झाले नाही.