मासे पकडणे जीवावर बेतले तरुणाचा बुडून मृत्यूविरुर स्टेशन : विरुर येथील दोन तरुण येथून जवळच असलेल्या वर्धा नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, मासे पकडताना एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. नितेश सुधाकर पेटकर (२८) असे मृताचे नाव आहे.

विरुर स्टेशन इंदिरानगर येथील नितेश सुधाकर पेटकर व दीपक वरवाडे हे दोघेही रविवारी दुपारी दोन

वाजताच्या सुमारास वर्धा नदीत धानोरा शेतशिवारात मासे पकडण्यासाठी गेले होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणाहून मच्छी पकडत होते. दरम्यान, सायंकाळी घरी परतण्याच्या वेळेस दीपक वरवाडे हा नितेशला बोलावण्यासाठी गेला असता तो दिसला नाही. त्याची चप्पल आणि इतर साहित्य दिसून आल्याने दीपकने आरडाओरड केली. त्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.