गुप्तधनाच्या लालसेपोटी वैरागड किल्ल्याच्या पायथ्याशी खोदकाम



 पूजेचे साहित्य सापडले; प्रशासन गाफील, ग्रामस्थांची नाही तक्रार


वैरागड : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वैरागड येथील किल्ला परिसरात गुप्तधन आहे, असा अनेकांचा समज असल्याने यापूर्वी अनेकदा खोदकाम झाल्याचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार पाच-सहा दिवसांपूर्वी घडला आहे. किल्ल्याच्या पूर्व दिशेला खंदकाच्या बाजूला दोन खड्डे केले आहेत. त्यातील एक खड्डा बुजवला आहे. सदर खोदकाम गुप्तधनाच्या लालसेपोटी केले असावे, कारण त्या ठिकाणी पूजा अर्चा केल्याचे साहित्य पडले आहे.

सोळाव्या शतकात वैरागड येथे नागवंशी राजा कुरुमप्रहोद यांची सत्ता होती. संरक्षणासाठी किल्ला बांधला होता. या ठिकाणी सैन्याचा तळ असायचा. पुढे चंद्रपूरचा राजा बल्लाळशाने काही काळ राज्य केले. त्यादरम्यान अनेकदा सेनापती युसुफखान यांनी वैरागडवर स्वाऱ्या केल्या. मोगल सैन्य धनसंपत्ती लुटून नेत. म्हणून धन तांब्याची नाणी, दुर्मीळ मूर्ती तत्कालीन लोक जमिनीत पुरून ठेवत. वैरागडला तांब्याची नाणी, दुर्मीळ देव-देवीच्या मूर्ती खोदकामात अनेकदा मिळाल्यात. पण, गुप्तधन सिद्धीने मिळवता येते त्याला कोणताही आधार नाही. हा कजलीचा प्रकार असून कष्ट करण्याची तयारी नसणाऱ्या काही व्यक्ती असा गोरखधंदा करतात, अशी चर्चा आहे.

हिऱ्याच्या खाणीच्या

गुप्तधन शोधण्यासाठी खड्डा खोदला असेल तर येथे नरबळी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिकांनी पोलिस ठाण्यात लवकर तक्रार द्यावी.

- विलास निंबोरकर, राज्य सहकार्यवाह वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प अंनिस




भंडारेश्वर मंदिरातही झाले होते खोदकाम

विदर्भातील सप्तधामांपैकी वैरागडचे भंडारेश्वर मंदिर आहे. सोळाव्या शतकात राजा बल्लाळशाची भावसून राणी हिराईदेवीने आपल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थं गावाच्या दक्षिणेला एका उंच टेकडीवर भंडेश्वराचे मंदिर बांधले. राणी हिराईदेवी मोठी दानशूर होती. पूर्वीच्या काळी एखादे देवालय जागृत असावे यासाठी मंदिर गाभाऱ्यात असणाऱ्या शिवलिगाची प्रतिष्ठापना करताना धनद्रव्य अर्पण केले जात असे. हा सगळा संदर्भ लक्षात घेऊन नोव्हेंबर १९९९ मध्ये काही समाजकंटक आणि भंडारेश्वर मंदिराच्या गाभायात असणारे शिवलिंग गुप्तधनासाठी खोदले होते. नंतर गावकन्यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली.


कापला होता बकरा

■ किल्ल्याच्या मागील प्रवेशद्वाराजवळ चिंचेचे झाड होते. त्या ठिकाणी एक मोठा खड्डा होता. गुप्तधनाच्या शोधासाठी सन १९८८ मध्ये त्या ठिकाणी पूजा-अर्चा करून बोकड कापून त्या बोकडाचे डोके ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार लोकांच्या खूप चर्चेत होता.

■ त्यानंतर चार-पाच वर्षांपूर्वी किल्ल्याच्या अंतर्भागात दोन-तीन ठिकाणी खोदकाम केले होते. वैरागड येथे गुप्तधन असण्याच्या अफेमुळे किल्ल्याच्या अवतीभवती खोदकाम करून गुप्तधन मिळवण्याचे अनेकदा अपयशी प्रयत्न केले जातात.