लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

वडधात सापळा : ट्रॅक्टरमालकाकडून कार्यालयात घेतले १२ हजारगडचिरोली / वडधा मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता सोडून देण्याचा मोबदला म्हणून १५ हजारांपैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रंगेहात पकडले. ही कारवाई १४ ऑगस्ट रोजी वडधा येथे करण्यात आली.

रमेश महागू कवडो (३२ वर्षे) तलाठी साजा क्रमांक १५ वडधा मंडळ कार्यालय देऊळगाव तालुका आरमोरी, असे लाच प्रकरणात अडकलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणात तक्रारदाराच्या मालकीचे ट्रॅक्टर डाली येथील खाणीतून मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना आरोपी लोकसेवक तलाठी रमेश कवडो याने ट्रॅक्टर पकडून पंचनामा करून सोडून दिल्याचा मोबदला म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. परंतुतक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. एसीबीने सापळा रचला. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी तलाठी कवडो याच्याच कक्षात तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आरोपी कवडो याच्याविरोधात आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलिस हवालदार नत्थू धोटे, पोलिस नाईक स्वप्निल बांबोळे, पोलिस शिपाई किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रफुल्ल डोर्लीकर आदींनी
केली.


ताडूरवार नगरातील घराची झडती

वडधा साजाचे तलाठी कवडो हे लाचलुचपत प्रतिबंधकविभागाच्या जाळ्यातअडकल्यानंतर आरमोरी येथील ताइवान नगरच्या त्यांच्या भाड्याच्या खोलीत एसीबीच्या चमूकडून झडती घेण्यात आली.