गायीला वाचविताना नदीत गुराखीही गेला वाहून
 धानोरा : नदीकाठी चरत असलेली गाय पाण्यात बुडाली. तिचा वाचविण्यासाठी गेलेला गुराखीही पाण्यात वाहून गेला. ही हृदयद्रावक घटना दुधमाळा येथे ५ ऑगस्टला घडली.

ऋषी रामजी दुगा (४८, रा. दुधमाळा) असे मृताचे नाव आहे. तो गुराखी असून नेहमीप्रमाणे नदीकिनारी गुरे घेऊन चारण्यासाठी गेला होता. एक गाय चरत असताना नदीत उतरली. पाण्याच्या प्रवाहात ती वाहून जाऊ लागली, त्यामुळे ऋषी दुगा यांनी पण्यात उडी मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की, गाय तर वाहून गेलीच, पण ऋषी दुगा यांनाही प्राण गमवावे लागले.

दोन किमी अंतरावर सापडला मृतदेहगावकयांनी ऋषी दुगा यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण अपयश आले. दुसया दिवशी नदीपात्रात दोन किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

चातगावचे प्रभारी अधिकारी संतोष पाटील यांनी. घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून धानोरा रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.