कुरखेडा: मार्गावरील नान्ही फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
अनिल शेंडे (४०, रा. लेंढारी व तेजराम कीरंगे (५०, रा. गुरनोली) अशी जखमींची नावे आहेत. शेंडे हे देसाईगंज मार्गे कुरखेडाकडे येत असताना नान्ही फाट्यावर विरुद्ध दिशेने तेजराम कीरंगे हे दुचाकीने येत होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. याच वेळी कुरखेडा येथील नगराध्यक्ष अनिता बोरकर या देसाईगंजकडे जात होत्या. त्यांनी रुग्णवाहिकेतून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.