मालेवाडा येथील नवयुवक युवकांकडून विजय कोळी सर यांना निरोप देण्यात आले


एजाज पठाण प्रतिनिधि 

आज दिनांक 24/8/2023 रोज गुरूवारला मालेवाडा येथील पोलिस मदत केंद्रातील उपनिरीक्षक विजय कोळी सर यांना मालेवाडा येथील श्री गणेश मंडळ अध्यक्ष, दुर्गा मंडळ अध्यक्ष, संजय मानकर, राधेश्याम शिडाम,एजाज पठाण व निशांत खोबरे आदींनी कोळी सर यांना शाल व श्रीफळ देऊन निरोप दिला.कोळी सर यांच्या कार्याविषयी सविस्तर सांगायचे म्हणजे सन 2020 ला ते मालेवाडा येथे रुजु झाल्यानंतर काही कालावधीत कोरोना महामारी सारखा महाभयंकर रोग आला व ह्या मुळे गावकरी खुप घाबरले अशातच कोळी सर यांनी गावकय्रांना व व्यापारी, कर्मचारी बांधवांना योग्य मार्गदर्शन केले.

कोरोना या माहामारी पासुन आपले बचाव कसे करता येईल यावर त्यांनी खुप समजावले व त्यानी ह्या संकटातून गावकय्रांना वाचवले आपल्या कर्तव्याचे पालन करत असतांना आपल्या जीवाची पर्वा न करता ते मालेवाडा येथील सर्व जनतेला काटेकोरपने सुरक्षा दीली.संकटाच्या वेळी नेहमी धाऊन येत असत असे सुंदर कार्य त्यांनी पार पाले त्यांच्या कार्याचे थोडक्यात महत्व श्री सुभाष गुंडरे दुर्गा मंडळ अध्यक्ष मालेवाडा यांनी उपस्थीतांना सांगीतले व कोळी सर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या....