स्टेटसवर पेटती चिता ठेवून मृत्यूला मारली मिठीआजारपणाला कंटाळून विहिरीत उडी नवरगाव (जि. चंद्रपूर) : एका ३० वर्षीय तरुणाने व्हॉट्सअॅप स्टेटसवर जळत्या चितेचा फोटो ठेवला. यानंतर गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिंदेवाहीत तालुक्यातील रत्नापूर येथे मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. दिनेश भालचंद्र चावरे असे या तरुणाचे नाव आहे. दिनेशची २०२० मध्ये कृषिसेवक पदासाठी निवड झाली होती. त्याच कालावधीत त्याला दुर्धर आजार जडला. या आजाराने त्याला असह्य वेदना व्हायच्या. होणारा खर्च, असह्य वेदनेला दिनेश कंटाळला होता.

धक्क्याने आजीचाही मृत्यू

दिनेशच्या अंत्यसंस्कारानंतर दिनेशच्या आजी जानकीबाई दिगांबर चावरे (७५) या अस्वस्थ होत्या, स्नान करीत असताना सायं. ५:४५ वाजता त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला.

एकटाच जळत होता

दिनेशने मंगळवारी व्हॉट्सअॅपवर जळत्या चितेचा फोटो ठेवून लिहिले की, 'याच्यासाठी, त्याच्यासाठी, नुसताच पळत होता. सगळेच गेले घरी निघून हा एकटाच जळत होता.'