अवघ्या १२ वर्षांच्या मुलीशी २८ वर्षांच्या तरुणाचा झाला विवाह


 मुंबई : अवघ्या १२ वर्षांच्या मुलीशी २८ वर्षांच्या तरुणाचा त्या मुलीच्या कुटुंबीयांच्या संमतीने बालविवाह करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या संबंधात चारकोप पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करत नक्याला अटक केली आहे. ही मुलगी गरोदर राहिल्याने तिचा विवाह करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

या अल्पवयीन मुलीचा विवाह बिहारमध्ये जानेवारीत करण्यात आल्यानंतर ती नवऱ्यासह मुंबईत चारकोप भागात राहावयास आली. तेथे भाडेतत्त्वावर घर घेऊन ते राहत होते. या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिचा पती तिला कांदिवलीच्या शताब्दी .

रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मुलगी गरोदर असून अल्पवयीन असल्याचा संशय त्यांना आला. तेव्हा याची माहिती त्यांनी चारकोप पोलिसांना दिली. परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती बागूल-भोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पुढील चौकशी सुरू केली. तेव्हा या मुलीचे वय अवघे १२ वर्षे ७ महिने आणि २३ दिवस असल्याचे उघड झाले. त्यानंतर, आरोपीविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत लगेचच त्याला अटक करण्यातआली