शांताबाई भैया महिला महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजराशांताबाई भैया महिला महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस मेजर ध्यानचंद जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ने. ही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए च. गहाणे, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सुभाष एम. शेकोकर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख ने. ही. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षा पी. कानफाडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
डॉ. डी. एच. गहाणे यांनी आपल्या भाषणात मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
डॉ. सुभाष एम. शेकोकर यांनी आपल्या मार्गदर्शनात मैदान आणि खेळ यावर खेळाडूंना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. हर्षा पी. कानफाडे यांनी मानवी जीवनात रोज खेळात सहभाग झाल्यामूले प्रामाणिक, संयम, संघर्ष व एकजूट पणा निर्माण होते असे भाष्य केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयात दि. 25 ते 29 दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पाहुण्यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्री. संजू मेश्राम यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.