पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून केला खून


नागपूर : एका वाहनचालक युवकाशी असलेले अनैतिक संबंध तोडण्यास सांगितल्यानंतरही पत्नी ऐकत नव्हती. त्यामुळे पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना रविवारी सकाळी ११ वाजता वाडीत घडली. प्रणाली दहाट (३०,त्रिशरण चौक, वाडी) असे मृत महिलेचे तर ललीत रामदास डहाट (४५) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

प्रणाली डहाट ही मूळची वर्धा जिल्ह्यातील आहे. तिचे पहिले चंद्रपुरातील एका युवकाशी झाले होते. तिला एक मुलगा व मुलगी आहे. तिला शहरात राहण्याचे वेड होते. सहा वर्षांपूर्वी पती व मुलांना सोडून नागपुरात आली. तिच्या घराशेजारी आरोपी ललीत राहत होता. तो सिकारा बारमध्ये बाऊंसर आहे. त्याला पत्नी राणी आणि दोन मुले आहेत. मात्र, त्याची प्रणालीशी ओळख झाली. दोघांची मैत्री झाली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचेही प्रेमसंबंध एवढे वाढले की त्याने पत्नीला सोडून दिले. तेव्हापासून दोघेही सोबत राहायला लागले.

प्रणाली ही एका कापडाच्या दुकानात नोकरी करीत होती. यादरम्यान, तिचे शेजारच्या एका वाहनचालक युवकाशी सूत जुळले. दोघांचेही प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांची चॅटिंग पती ललीतने वाचली. त्यामुळे दोघांचे अनेैतिक संबंध जुळले. त्यामुळे त्याने पत्नीची समजूत घालून अनैतिक संबंध तोडण्यास सांगितले. मात्र, ती ऐकायला तयार नव्हती. शनिवारी दोघांत वाद झाल्याने ती वर्धा येथे माहेरी निघून गेली. ती रविवारी सकाळी आठ वाजता नागपुरात परत आली. ललीतचा पत्नीशी अनैतिक संबंधावरून वाद झाला. तिने अनैतिक संबंध तोडण्यास नकार दिल्यानंतर ललीतने प्रणालीचा चाकूने गळा चिरला. त्यानंतर त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला फोन केला. खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.