भरधाव ट्रकच्या धडकेत एका दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एका दुचाकीवरील दोघे जखमी

चंद्रपूर – भरधाव ट्रकचालक अंदाधुंद वाहन चालवीत दोन दुचाकींना जबर धडक दिल्याने भिषण अपघात घडला.
यात एका दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एका दुचाकीवरील दोघे जखमी झाले.

राजूरा सास्ती बल्लारपूर मार्गावरील धोपटाला जवळील जवेरी पेट्रोल पंप जवळ भरधाव ट्रकने दोन दुचाकींना जोरदार टक्कर दिल्याने भिषण अपघात आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात ते 8 वाजताच्या दरम्यान घडला यात धोपटाला येथील रहिवासी नीलेश वैद्य 35, त्यांची पत्नी रुपाली वय 30 वर्ष व 3 वर्षाची मुलगी (मधु) जागीच ठार झाले तर सास्ती मार्गावर दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या रामपूर येथील प्रसाद टगराफ 40 वर्ष व प्रज्ञा टगराफ 33 वर्ष हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मद्यधुंद ट्रक चालकाला राजूरा पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास राजूरा पोलीस करीत आहेत.