बसला ट्रकची मागून धडक; १५ प्रवासी जखमी




 भेजगाव : मूलवरून चंद्रपूरला जाणारी बस (क्र. एमएच ४० एन ८९८२) गोंडसावरी बसस्थानकावर विद्यार्थी प्रवाशांना घेण्याकरिता थांबली असता, मूलमार्गे चंद्रपूरला जाणाऱ्या ट्रकने (टीएस २२ टी ०८२६) उभ्या बसला मागून जोरदार धडक दिली. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

प्रवाशांसह बसस्थानकात उभे असलेले प्रवासीसुद्धा जखमी झाले. तसेच ट्रकचालकसुद्धा जखमी झाला. बसमध्ये जवळपास १५ प्रवासी होते. मात्र बसमध्ये चढत असलेले तीन प्रवासी यात गंभीर जखमी झाले. जखमींना चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींची नावे कळू शकली नाहीत. घटनास्थळी मूल या धडकेत बसमधील काही पोलिसांनी पोहचून पंचनामा केला.