२० लाखांचे बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गजाआड





गडचिरोली : दंडकारण्यासह गडचिरोलीच्या नक्षली चळवळीत दहशत व डोक्यावर २० लाखांचे बक्षीस असलेल्या दाम्पत्याला तेलंगणा पोलिसांनी मध्यप्रदेशच्या जबलपूर येथून अटक केली. ही कारवाई २२ ऑगस्टला केली असून, नक्षली चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कुसनन अशोक रेड्डी ऊर्फ बलदेव आणि कुमारी कोटाई ऊर्फ रहमती असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. तेलंगणा पोलिसांनी जबलपूरमधून त्यांना ताब्यात घेतले. दोघांवरही २० लाखांचे बक्षीस होते.