रस्त्यावर ट्रॅक्टर ठेवणाऱ्यांवर गुन्हा
गोंदिया: दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम लोधीटोला ते दवनीवाडा रस्त्यावर २७ ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजे ८५९९ ला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभा

करून ठेवल्यामुळे संदेश दुवरलाल मेश्राम (२३, रा. लोधीटोला) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या कारवाईत, ग्राम मुरदाडा ते सायटोला रस्त्यावर आरोपी पवन आनंद मेश्राम (२६, रा. धापेवाडा) याने

ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एजे ११४७ ला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभ करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्याच्यावर २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाआहे