अन दारू पिऊन चालक स्टिअरिंगवरच झोपला

बसमधील २२ प्रवासी थोडक्यात बचावल

यवतमाळ : यवतमाळहून छत्रपती संभाजीनगरसाठी २२ प्रवासी घेऊन निघालेली एसटी महामंडळाची बस आहे. कारंजा रोडवरील पाच किमी अंतरावर असलेल्या चिखली फाट्यावर पोहोचल्यानंतर वेडीवाकडी धावू लागली, प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर बस थांबली. मात्र, चालक स्टिअरिंगवरच मान टाकून झोपी गेला. प्रवासी तसेच वाहकांनी विचारपूस सुरू केली. तर चालक दारूच्या नशेत आढळला. त्याला धडपणे बोलताही येत नव्हते. अखेर दारव्हा आगाराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी

चालकाला पोलिसांच्या हवाली केले. वैद्यकीय तपासणीनंतर या चालकाची पोलिस कोठडीत रवानगी झाली

हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे. यवतमाळ आगारातून बस छत्रपती संभाजीनगरसाठी मंगळवारी सकाळी सुटली. या बसमध्ये चालक म्हणून नारायण मारोती एकुंडवार तर वाहक म्हणून प्रशांत पांडुरंग भगत नेमणुकीस होते. बस पुढे दारव्हा येथून निघून चिखली फाट्यावर पोहोचली असता अचानक वेडीवाकडी धावू लागली. हा प्रकार पाहून प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली.