रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा- बायकोची उडाली झोपगडचिरोली:  पती-पत्नीचे नाते म्हणजे स्नेहाचे, सौख्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे आहे. मात्र, आधुनिक काळात व्हॉट्सअॅप, फेसबुक या सोसन मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच रात्री होणाऱ्या चॅटिंगवर काही पती-पत्नींमध्ये भांडणे होत आहेत. विशेष  करून दिवसापेक्षा ही भांडणे रात्री होत असल्याने त्यांची झोपही उडत आहे. थाटलेला संसार उघड्यावर येण्याची भीती आहे. एकमेकांवर १०० टक्के विश्वास ठेवून संसार वाटचाल करणाऱ्या जोडप्यांचे जीवन सुखी राहते. मात्र, स्मार्टफोन हाती आल्यापासून काही ठिकाणी पत्नी तर काही ठिकाणी पती  रात्रीच्या सुमारास चॅटिंग करीत असल्याने दोघांमध्ये भांडणे होतात.