तालुक्यातील कुरुड येथील आईवडिलांचा छञ हरवल्याने अनाथ झालेल्या बालकांना आपल्या परीने शक्य ती मदत करून सामाजिक बांधीलकी जोपासण्याकरीता एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मनोज ढोरे यांनी शालेय किट व कपडे देऊन उपक्रमाची सुरूवात केली.त्यांच्या या मौलीक कार्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
सात आठ महिण्यापुर्वी कुरुड येथील भागडकर परीवारातील इश्वर बाजीराव भागडकर यांची पत्नी इशाखा भागडकर यांचे दु:खद निधन झाले.त्याच्या काही दिवसानेच इश्वर भागडकर याचे देखील दु:खद निधन झाल्याने उमललेली दोन चिमुकले अनाथ झाले.म्हातारपणात ज्या मुलाचा आधार व्हावा त्याच्या आधी पत्नी आणि नंतर तो देखील कायमचा सोडून गेल्याने म्हाताऱ्या आजी आजोबांना त्या चिमुकल्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी आली.
मिळेल त्या मजुरीच्या भरोशावर व अलिकडे प्रचंड वाढलेल्या महागाईने जगणे मुश्किल केले असले तरी असलेल्या स्थितीत आजी आजोबा चिमुकल्या नातवंडांचा भार उचलत आहेत.याबाबत ढोरे यांना माहिती मिळताच त्यांनी भागडकर परीवाराची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. वस्तुस्थिती ऐकून एक हात मदतीचा हा मागील दोन वर्षापासून सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांची गरज लक्षात घेता त्यांना शालेय किट व कपडे भेट देऊन त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.