ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार




मुलचेरा : तालुक्यातील शांतिग्रामजवळ सुरजागडकडे निघालेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात तरुण जागीच ठार झाला, तर दोघे जखमी आहेत. ही घटना ५ ऑगस्टला सायंकाळी सात वाजता घडली.

प्रदीप पात्रा (२५, रा. इल्लूर आष्टी, ता. चामोर्शी) असे मयताचे नाव आहे. तो लगाम येथे आनंद रॉय यांच्या हार्डवेअर दुकानात कामाला होता. ५ ऑगस्टला दुकान बंद करून आनंद रॉय यांच्या दुचाकीवरून ट्रिपल सीट लगाम येथून बोरीकडे जात होता. सायंकाळी सात वाजता शांतिग्रामजवळ दुचाकीला सुरजागडकडे जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून धडक दिली. यात प्रदीप पात्रा हा जागीच ठार झाला. आनंद रॉय व अन्य एक जखमी असून, त्यांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या भीषण अपघातानंतर रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. घरातील कर्ता तरूण गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला. रुग्णालयात नातेवाईक व कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.