भरकटलेल्या इसमाला दिला मदतीचा हात* *ओबीसी काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव मनोज ढोरे यांच्या प्रयत्नाने सुखरूप त्यांच्या गावाला रवाना करण्यात आला


देसाईगंज ७वार्ता
दिलेश्वर अनंतराम लिल्लारे वय, अंदाजे २५ मु. सावरी टोला पोस्ट,सावरी तालुका गोंदिया जिल्हा गोंदिया सदर इसम मौजा कूरुड येथे हा इसम जुन्या मारुती मंदिराजवळ काल दुपारपासून कुरुड गावात आला होता लगेच आमचे मित्र भुवन लीलारे यांना संपर्क करून त्या इसमाचा पत्ता काढण्यात आला पत्ता लागताक्षणी कूरुड वरून त्याला त्याच्या गावी नेण्यात आले .. गावी जाण्याअगोदर त्याला पोलीस स्टेशन रावणवाडी येथे घेऊन गेल्यानंतर त्यांची घरून निघून गेल्याची तारीख १३/७/२०२३अशी नोंद होती. लगेच पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मेश्राम, ए. एस. आय. भगत साहेब, बीट जमादार गुलाब तुरकर , पोलीस कॉन्स्टेबल रमेश बिसेण यांचे समक्ष त्याच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले आणि त्या इसमाला सुपूर्द करण्यात आले याप्रसंगी पिंटेश्वर लीलारे, चक्रधर उरकुडे, वैभव शिलार सोबत होते इसमाच्या काका वडिलांनी आमचे आभार मानले पोलीस प्रशासन रावणवाडी पोलीस स्टेशन यांच्यातर्फे पोलीस दक्षता पीपल असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे प्रदेश सचिव मनोज ढोरे यांचे विशेष आभार मानले.