मोहघाटा जंगल शिवारात महामार्गावरील घटना
साकोली:
तालुक्यातील मोहघाटा जंगल शिवारातील सराटी फाटा महामार्गावर दि. २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता दरम्यान एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गोविंद किशोर सोरते (३४) रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृतकाचे नाव आहे.
साकोली येथील शिवाजी वार्डातील गोविंद सोरते हा मोटारसायकल क्र. एम एच ३५ ए यु ५७१८ या गाडीने रात्री १ वाजता दरम्यान साकोली येथून भंडाऱ्याकडे येत असताना मोहघाटा जंगल शिवारात सराटी फाट्यावर एकाअज्ञात वाहनाने
मोटरसायकलला धडक देऊन पसार झाला.
त्यात मोटारसायकलस्वार गोविंद सोरते गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. सदर महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने या महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याने या अगोदर सुद्धा अनेक अपघात घडलेले आहेत. अपघाताची माहिती साकोली पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. सदर अपघाताची नोंद साकोली पोलिसात केली आहे.