शरद पवार सोबत आले नाहीत तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, अशी अट मोदींनी अजित पवारांना घातली आहे, असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहेशरद पवार आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल अन्यथा तुम्हाला सीएम पदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही .

अशी माहिती समोर येतेय. म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचेय यामुळे पवारांना सोबत चला असा आग्रह असू शकेल. यातून त्यांची भेट घेऊन दया याचना करत असतील असे म्हणालायला हरकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांना मोदींच्या मनात काय सुरु आहे हे समजत असेल तर मग काँग्रेसने विरोधी पक्षनेता का केले असा प्रश्न पडेल. मोदींच्या एवढा जवळचा नेता विरोधी पक्षनेते पदी आला आहे. मोदींनी अशी अट घातली असती तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदी कसे बसले असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसह राजकीय परिस्थिती पाहता मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी अजित पवारांसारखे नेतृत्व असलेला नेता सोबत असण्याची आवश्यकता आहे. अजित पवारांमुळे राज्याच्या विकासात गती येऊ शकते या विचारातून सरकारच्या प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आहे, असे अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.

अजित पवारांनी काकांसमोर दोन प्रस्ताव ठेवले?
शरद पवारांना केंद्रात कृषी खाते आणि निती आयोगाचे चेअरमनपद अशा २ ऑफर अजितदादांसोबतच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. परंतु शरद पवारांनी या दोन्ही ऑफर नाकारल्या असं त्यांनी सांगितले. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून आतापर्यंत ३-४ वेळा या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. शरद पवारांना एनडीएकडे वळवावे अशी यामागची भाजपाची रणनीती असल्याचे दिसून येते. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनाही सामावून घेण्यासाठी शरद पवारांना ऑफर दिली. अलीकडेच अजित पवारांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. त्यातून शरद पवारांना ही ऑफर कळवावी असा निरोप अजितदादांना देण्यात आला, असा दावा काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.