लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्मावर घणाघाती हल्ली केला आहे़ लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले की, हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचे कट कारस्थान आहे़.
या कार्यक्रमात बोलताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्म ही केवळ फसवणूक आहे. ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचा हा डाव आहे. हिंदू धर्म असता तर आदिवासींनाही आदर मिळाला असता. सर्व विषमतेचे कारण ब्राह्मणवाद आहे. दलित आणि आदिवासींना जाळ्यात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढे मौर्य म्हणाले की, ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर रूजली आहेत. हिंदू धर्म असता तर या समाजात मागासलेल्यांचा सन्मान झाला असता, पण आदिवासी समाजातून येणाºया राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंदिरात जाण्यापासून रोखले जाते ही काय गंमत आहे.