१९ वर्षाचे युवा सामाजिक कार्यकर्ते युवारंग चे सदस्य मा.प्रथमेश साळवे यांच्या हस्ते इंदिरा नगर डोंगरी येथे ध्वजारोहण सोहळा पार पडला .



आरमोरी :- सदैव क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या युवारंग तथा जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर डोंगरी व अंगणवाडी इंदिरा नगर ,डोंगरी यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर डोंगरी, आरमोरी येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ ला सकाळी ठीक :- ७:३० वाजता पार पडला याप्रसंगी युवारंग च्या माध्यमातून नेहमी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहमी कार्य करणारे सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणारे युवारंग चे सदस्य मा.प्रथमेश साळवे या १९ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय ,वंदे मातरम चे जयशोष केले या कार्यक्रमाची तयारी   युवारंग चे सदस्य विशाल चौके , प्रेम चौके, मुरलीधर कुकडकार यांनी केली ,कार्यक्रमाचे संचालन अवंतिका साळवे हिने केले याप्रसंगी
वार्डातील नागरिक  राजुजी चौके , अनिल साळवे , अनंता गाढ़वे , अविनाश रामटेके, सुनील बांबोळे, निलेश धाइत, जिल्हा परिषद शाळा इंदिरा नगर डोंगरी चे विद्यार्थी व शिक्षक खरकाटे सर , नरेंद्र चौके, मीना साळवे व अंगणवाडी केंद्र डोंगरी चे चिमुकले विद्यार्थी उपस्थित होते.