पट्टेदार वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी





सावली : तालुक्यातील उसरपार चक येथील गुरे राखण्यासाठी गेलेल्या शेतक ऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज शनिवार दि. १२ ऑगस्टला घडली.

सुरेश गणपत दाजगाये ४५ वर्ष असे जखमी शेतक ऱ्याचे नाव असून तो उसरपार चक येथील रहिवाशी होता. घटनेच्या दिवशी जखमी सुरेश आणि त्याचे काही साथीदार उपक्षेत्र पाथरी उसरपार चक कक्ष क्र. १४८ लगत आपली गुरे चराई करीत असताना या भागात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सुरेश वर हल्ला केला. दरम्यान त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांनी आरडाओरड केल्याने वाघ घटना स्थळावरून पसार झाला. जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथे उपचारार्थ भरती केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने जखमीला सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले.

पाथरी उपक्षेत्रा अंतर्गत अनेक शेत जमीनी जंगलालगत असून या जंगली भागाचा अंदाज घेऊन आणि सध्या पावसाचे दिवस असल्याने जंगल घनदाट आहे. या भागात वन्य जीवांची अन्नासाठी भटकंती होत असते त्यामुळे शेतकऱ्यानी, दक्षता घ्यावी असे वनविभागाकडून सांगितले जात आहे .....

- प्रविण विरूटकर वनपरिक्षेत्र अधिकारी सावली