रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण. या दिवशी संपूर्ण भारतात बहिण आपल्या भावाला मोठ्या आनंदाने राखी बांधून भावाकडून रक्षणाची जबाबदारी घेते. तसेच भाऊ सुद्धा मोठ्या आनंदाने राखी बांधून बहिणीची रक्षा करण्याचे वचन देते. असा हा रक्षाबंधनाचा सण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोरी येथे मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक पी एन जगझापे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक शिक्षक गुंफेस बिसेण, पवन कुमार कोहळे, गीता बडोले यांनी मुलींकडून मुलांना राखी बांधून घेतले. विद्यार्थ्यांनी आपल्या बहिणीला भेट म्हणून वही, नोटबुक, पेन, चॉकलेट इत्यादी भेट वस्तू दिल्या. तसेच वर्गात आपण सर्व बहिण भाऊ एकत्र राहू, कोणालाही त्रास देणार नाही अशी शपथ घेतली.
विद्यार्थिनींनी शिक्षकांना सुद्धा राखी बांधून घेतली. तसेच विद्यार्थ्याकडून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सुद्धा घेण्यात आली.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्याना गोलाकार उभे करून राखीची प्रतीकृती तयार करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदमय पद्धतीने टाळ्या वाजवून सर्वांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिले जाते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना गहाणे, पूर्वा ठाकरे, ईशांत शेंडे, बेलखोडे, यांनी सहकार्य केले.