कॅगचा मोठा खुलासा! मोदी सरकारचे 7 घोटाळे केले उघड




कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षण (CAG) चा नवीन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालाच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालामध्ये मोदी सरकारचे सात घोटाळे समोर आले आहे.


 कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षण (CAG) चा नवीन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालाच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या अहवालामध्ये मोदी सरकारचे 7 मोठे घोटाळे समोर आले आहे. द्वारका एक्सप्रेस वे या मार्गासाठी 18 कोटी 20 लाख रुपये प्रति किलोमीटर इतका निधी मंजूर झाला होता. मात्र, या प्रकल्पासाठी तब्बल 250 कोटी रुपये खर्च झाले, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे.

कॅगने मोदी सरकारचे (Narendra Modi) 7 मोठे घोटाळे उघड केले आहे.


1. भारतमाला प्रकल्पाच्या बोलीत फसवणूक

2. १८ कोटीत तयार होवू शकणाऱ्या द्वारका एक्सप्रेस-वे वर 1 कि.मी. रस्ते बांधणीसाठी 250 कोटी रुपये खर्च केले

3. NHAI ने टोल नियमांचे उल्लंघन करून जनतेकडून 132 कोटी वसूल केले

4. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.5 लाख लाभार्थी एकाच क्रमांकाशी जोडून लाभ देण्यात आला

5. अयोध्या विकास प्रकल्पातील कंत्राटदारांना अवाजवी फायदा

6. ग्रामीण विकास मंत्रालयाने पेन्शन योजनेचा पैसा मोदी सरकारच्या प्रचारात खर्च केला

7. HAL वर विमान इंजिनच्या डिझाईन-उत्पादनात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप, 154 कोटींचे नुकसान








कॅगच्या या अहवालानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरू केलं आहे.



दरम्यान, कॅगच्या अहवालावरून वाद सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं विधान केलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून देखील शरद पवारांनी अजित पवार यांच्या वारंवार बैठकी होत आहेत. कारण लोकसभेतील आकडा वाढवण्यासाठी भाजपला शरद पवारांची गरज आहे.

म्हणून नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना एक अट घातली आहे. अजित पवारांना जर राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं असेल तर त्यांना शरद पवारांना भाजप सोबत घेऊन यावं लागेल असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं अजित पवार शरद पवारांना भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरत आहे.”