जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे दि.१५/८/२०२३ रोज मंगळवरला भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ठिक सकाळी 7.30 वाजता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.दिनेश बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीत व ध्वज गीताचे गायन करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.त्यानंतर गावातील मुख्य चौक व ग्रामपंचायत कार्यालय कोसबी येथे ध्वजारोहण पार पडले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमातर्गत शाळेत छोटेखानी कार्यक्रम पार पडला.त्यामधे प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे भाषण, देशभक्ती गीतावर आधारित नृत्य झाले.सामाजिक बांधिलकीतून कोसबी येथील श्री. राहुल लिंगायत यांनी स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वितरित केले.
मान्यवरांनी देखील बहुमूल्य मार्गदर्शन केले. "हर घर तिरंगा"हा उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी दि.१३/८/२०२३ ते दि.१५/८/२०२३ ला ध्वरोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी श्री.दिनेश जी बनकर शाव्यस अध्यक्ष, श्रीमती कविता ताडाम सरपंच कोसबी,मुख्याध्यापक श्री. सोनटक्के सर, उपसरपंच प्रलयजी चहादे, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. ईश्वरजी मेश्राम, पोलीस पाटील श्रीमती माधुरीताई सहारे, श्री.विनोदची मानकर, श्रीमती वैशालीताई ढोरे सचिव ग्रामपंचायत कोसबी याखेरीज गावातील आजी माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, विदयार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वनाथ सोनटक्के सर तर सूत्रसंचालन श्री प्रशांत ठेंगरे सर यांनी केले.