मोदींचं रक्षाबंधन गिफ्ट! घरगुती सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या दरातही मोठी कपात करण्याची शक्यता...*


💁🏻‍♂️ मोदी सरकारने देशातील भगिनींना रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं असून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर २०० रुपयांची सूट दिलेली आहे. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरवर ४०० रुपयांची सूट देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली, या निर्णयाचा फायदा ७५ लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहे. देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकाही डोळ्यासमोर आहेत. त्या अनुषंगाने केंद्राने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

📣 *केंद्राची घोषणा*
३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी तर, उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत ११०३ रुपये, कोलकाता ११२९ रुपये, मुंबईत ११०२ आणि चेन्नईत १११८.५० रुपये आहेत.

⛽ *पेट्रोल-डिझेलच्या दरातही दिलासा?* 
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चांगली कमाई केली असून करोनाच्या वेळी झालेले नुकसान आता भरून निघाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार वाहन इंधनाच्या दरातही मोठी कपात करू शकते.