ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू मोबाइलवर बोलत असताना दिली धडक




 रावणवाडी आपल्या घरासमोरील रस्त्यावर मोबाइलवर बोलत असलेल्या युवकाला ट्रॅक्टरने धडक दिल्याने युवक ठार झाल्याची घटना रविवारी (दि. ९) सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील चारगाव येथे घडली. प्रेमलाल पंधरे (४०, रा. चारगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रेमलाल पंधरे  हा रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रस्त्यालगत त्याच्या घरासमोर उभा राहून कुणाशी तरी मोबाइलवर बोलत होते. तो मोबाइलवर बोलत असताना सिरपूरकडून रोवणीच्या कामासाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. दरम्यान, तो ट्रॅक्टरच्या

कॅजवेलमध्ये अडकल्याने काही अंतरावर फरफटत गेला. कॅजवेलमध्ये फसल्याने प्रेमलाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी एकत्र येत ट्रॅक्टर चालकाला पकडले व या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली 

माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद केला आहे