बोडीत उडी घेऊन आत्महत्या



गडचिरोली . दारूच्या व्यसनामुळे एका इसमाने गावालगतच्या बोडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथे रविवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पुरुषोत्तम रामदास धारणे (50) रा. अमिर्झा असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

पुरुषोत्तम धारणे याला दारूचे व्यसन होते. व्यसनामुळे तो दोन-चार दिवसांपूर्वी घराबाहेर पडला होता. दरम्यान, रविवारला त्याने बोडीत आत्महत्या केल्याचे काही मजुरांच्या लक्षात आले. याची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली... पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढला.