बापरे बाप..! गोठ्यात शिरून वाघाने केली बकऱ्या व कोंबड्याची पार्टीचिमूर तालुक्यातील वाढोणा येथील घटना : नागरिकांमध्ये दहशत


आंबोली भिसीपासून सात किमी अंतरावरील जंगलालगत वसलेल्या वाढोणा गावातील शेतकन्याच्या शेतातील गोठ्यात शिरून वाघाने दोन बकऱ्या व शंभर कोंबड्या मारल्या. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

द्रौपदा तुळशीराम चिखले या महिलेचे वाढोणा गावापासून पाचशे मीटर अंतरावर शेत आहे. शेतात छोटे घर व गोठा आहे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास द्रौपदा व

तुळशीराम हे दोघे पती पत्नी शेतातील घरात झोपून होते. गोठ्यात शेळ्या व कोंबड्या होत्या. जोरदार पाऊस सुरू असताना वाघाने गोठ्यात शिरून बकऱ्यांवर हल्ला केला व दोन बकया ठार केल्या. त्यानंतर शंभर कोंबड्या मारल्या. त्यातील अनेक कोंबड्या फस्त केल्या. बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर वाघ गोठ्यात शिरल्याचे 

तुळशीराम व द्रौपदा यांच्या लक्षात आले. पण, कोंबड्या व बकन्या वाचवायला गेल्यास वाघ आपल्यावरही हल्ला करेल या भीतीने दोघेही घरातच राहिले. वाघाच्या हल्ल्यामुळे द्रौपदा चिखले यांचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भिसी उपवन क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चिखले परिवाराला वन विभागाने ताबडतोब आर्थिक मदत करावी, अशी मागणी वाढोणा येथील गावकऱ्यांनी केली आहे.