लिफ्टच्या बहाण्याने लूटमार करणाऱ्यास ठोकल्या बेड्याआरमोरी लिफ्टच्या बहाण्याने लूटमार करणाऱ्या सराईत आरोपीला येथील पोलिसांनी २२ जुलै रोजी बेड्या ठोकल्या. प्रकाश आनंदराव मेडपल्लीवार (वय ३०, रा. चाकलपेठ, ता. चामोर्शी), असे आरोपीचे नाव आहे.

नीलकंठ उरकुडा प्रधान (रा. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) यांच्या फिर्यादीनुसार, १६ जुलै रोजी ते पिकावरील फवारणीची औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून (एमएच ३४ एई ७६०७) आरमोरीकडे जात होते. पैसे कमी असल्याने गुरुदेव बगमारे (रा. रुई) यांच्या खरकाटा फाटा येथील पानटपरीवरून त्यांनी १६ हजार रुपये घेतले. हे पैसे त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवले होते. दरम्यान, टपरीजवळ एक तरुण उभा होता. त्याने नीलकंठ प्रधान यांना लिफ्ट मागितली. पाऊस सुरू असल्याने त्यांनी लिफ्ट मागितली.

आरसोडा फाट्यावर प्रधान यांनी दुचाकी लघुशंकेसाठी थांबवली. याचा फायदा घेत गुरुदेव बगमारे याने दुचाकी पळवली. दुचाकीसह मोबाइल व रोख रक्कमही त्याने लंपास केली.एक दिवसाची कोठडी

 दरम्यान, २३ जुलै रोजी आरोपी गुरुदेव बगमारे यास आरमोरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्यावर गडचिरोली, पंडरी, वडसा, आरमोरी या ठाण्य पूर्वी गुन्हे नोंद आहेत.

गुन्हा नोंदवला. त्यानंतर पो.नि. संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन भिलारी, सहायक उपनिरीक्षक गौतम चिकणकर व त्यांच्या पथकाने तपासचक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर २२ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता गुरुदेव बगमारे याबाबत १८ रोजी पोलिस ठाण्यात यास अटक केली.