आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून दिव्यांग व्यक्तीचे समुदाय आधारित पुनर्वसन कार्यक्रम चालू आहे. त्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांचे अधिकार, कायदे, योजना, विषयी जागृत करणे, समाजात दिव्यांग व्यक्तीविषयी जाणीव जागृती करणे, बचत गट, संघटना स्थापन करून दिव्यांगांना एकत्रित आणणे. सोबतच त्यांचे प्रश्न, समस्या यावर विचार विनिमय करून त्या सोडविण्यासाठी शासकीय विभागाशी समन्वय करणे अश्या विविध प्रकारचे सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, वैद्यकीय पुनर्वसनाचे काम संस्था करीत आहे. यासोबतच 18-35 वयोगटातील 10 वी पास/नापास व त्यापुढील शिक्षण झालेल्या दिव्यांग मुला-मुलींना निःशुल्क रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये कामाला लावून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जे दिव्यांग बांधव घराबाहेर जाऊन रोजगार करू शकत नाही अश्या दिव्यांगांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन गावातच विविध व्यवसायाला लावून त्यांना स्वतःचा आर्थिक विकास घडवून आणलेला आहे . ज्या माध्यमातून दिव्यांगांची वाटचाल स्वावलंबनाच्या दिशेने सुरू झालेली आहे.
तेव्हा अश्या विविध दिव्यांगांच्या संदर्भात असलेल्या योजनांची, कायद्याची, रोजगाराची, स्वयंरोजगारची माहिती देण्यासाठी *तहसील कार्यालय आरमोरी* येथे दि.13/07/2023 रोज गुरुवारला ठीक 10.30 वाजता *दिव्यांगांच्या योजना, कायदे, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन* मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मा. माने सर तहसीलदार आरमोरी, मा. डॉ. सतीश गोगुलवार संस्थापक आम्ही आमच्या आरोग्यासाठी, मा. कुर्झेकर सर बिडीओ पं.स.आरमोरी, मा. नारनवरे सर नगराध्यक्ष आरमोरी ह्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे
तरी दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आव्हान आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे