नियुक्ती करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे मानले आभार :
राजेंद्र बागडे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
दैनिक देशोन्नती व दैनिक विदर्भ केसरी वृत्तपत्राचे पत्रकार, त्रिमूर्ती बुद्धविहार पंचकमेटीचे अध्यक्ष,राजेंद्र व्ही.बागडे यांची महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या नागपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, प्रदेश महासचिव एड. श्याम खंदारे, विदर्भ विभाग प्रमुख मनोहर शहारे, विदर्भ महिला प्रमुख सरिता उराडे, नागपूर शहर प्रमुख जयंत साठे, नागपूर जिल्हा महासचिव शालिक जिल्हेकर, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद पाटील, नागपूर शहर सचिव जगदीश राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राजेंद्र बागडे हे एक झुंजार पत्रकार असून त्यांनी आपल्या लेखणीला 2008 पासून दैनिक देशोन्नती या वृत्तपत्राला लिहण्याला सुरुवात केली विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित, बहुजन समाजातील उपेक्षित बांधवांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. नरखेड तालुक्यातील भीम आर्मीचे नरखेड काटोल विधानसभा प्रमुख वसंत पाटील, समीर पांढरकर, हेमंत घारपुरे, नितेश पिकले, हेमंत वाईकर, अमित राठोड,गोलू चक्रपाणी,अशोक बागडे,सुधीर रामटेके, त्रिमूर्ती बुद्धविहार पंचकमेटीच्या सर्व सदस्यांनी त्याचे तोंडभरून अभिनंदन व कौतुक केले.