देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील नानाजी विठोबा प्रधान ( ३९ ) यांचे दि. १५ जुलैला सायंकाळी रेल्वे अपघातात निधन झाले.
सदरअपघातअर्जुनी/ मोर.
तालुक्यातील अरुणनगर हद्दीत घडला. मृतक कालपासून घरून निघून गेला असल्याचे प्राप्त सूत्राद्वारे कळले. मृतकाचे शव रेल्वे सुरक्षा बल यांनी शवविच्छेदनाकरीता अर्जुनी/मोर. ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. पुढील तपास अर्जुनी/मोर पोलिस करीत आहेत. मृतकाच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ व दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे.