लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार...

💁🏻‍♂️ कन्नड तालुक्यातल्या एका गावात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत भयंकर कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून घटनेमुळे पुन्हा एकदा छ. संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.

🗣️ सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन मेहुणीलाच लग्नाचं आमिष दाखवून बाहेरगावी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून समोर आली. 20 वर्षीय आरोपीचा 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अधूनमधून तो सासुरवाडीला येत असे. याच दरम्यान तो पीडितेसोबत जवळीक साधू लागला. ऊसतोडणी करून आल्यावर आरोपी पत्नीसोबत सासुरवाडीत अद्रक काढणीचे, लागवडीचे काम करू लागला. 

👉🏻 याच दरम्यान आरोपीने अल्पवयीन मेहुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. 22 मे रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने आरोपीने पीडितेस तिच्या भावासह बाजार करण्यासाठी कन्नड येथे घेऊन आला. भावाला दुसरीकडे पाठवून पीडितेस फूस लावून मोटारसायकलने सातारा जिल्ह्यातील मयनी (धोंडेवाडी) येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला..

▪️नंतर 2 जुलैला आरोपी पीडितेला कन्नड तालुक्यातील गावी घेऊन आला. नातेवाईकांनी याप्रकरणी माहिती मिळताच आरोपी आणि पीडितेस कन्नड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.