आगामी शासकीय नौकर भरतीत तलाठी या पदासाठी अर्ज सादर करतेवेळी पेसा प्रमाणपत्र प्रकल्प कार्यालयातून देण्यात येत आहे, करीता विनंती अर्ज सादर करूनही उमेदवार पेसा प्रमाणपत्राची आठवडा भर वाट बघत आहे. तसेच तलाठी या पदासाठी शेवटची तारीख १७ जुलै २०२३ असल्याने अर्ज करण्यासाठी एकूण पाचस दिवस शिल्लक असून उमेदवारांची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी धावपळ सुरू आहे आणि उमेदवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन उमेदवार त्रासून गेलेला आहे. तलाठी पदासाठी पेसा प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पेसा प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे.
यावेळी प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हा अधिकारी मैनक घोष यांनी उमेदवारांनी लवकरात लवकर कागदोपत्री सह विनंती अर्ज सादर करावे व दिनांक १४ जुलै पर्यंत आपणा सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येतील.
त्यानंतर तीन दिवस उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळ असून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी निवेदन बिरसा ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष गणेश वरखडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, संजय गावडे, संदीप वरखडे, आविस चे नेते राजु परसे, आविसचे विनोद हलामी, डॉ साईनाथ कोडाप, गांगसाय मडावी, सदाराम हलामी, भोजराज आत्राम, दत्ता करंगामी, अक्षय सिडाम, विनोद ताडाम आदी प्रकल्प कार्यालयात हजारोंच्या संख्येने उमेदवार उपस्थित होते.