झोपेतून उठवायला गेला, मामेसासऱ्याचा जीव घेतला,जावयाला ठोकल्या बेड्या

 चामोर्शी : झोपलेल्या भाचेजावयाला जागे करण्यासाठी डोक्यावर हात ठेवला. त्याचा राग आल्याने मामेसासऱ्याच्या डोक्यावर भाचेजावयाने काठीने जोरदार प्रहार केला. यात मामेसासरा जागीच ठार झाला. ही घटना सोनापूर येथे २३ जुलै रोजी घडली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

लहानू जगनाथ उराडे (६५, रा. सोनापूर) असे मृताचे तर शरद माधव वनकर (३७, रा. सोमनपल्ली) असे आरोपीचे नाव आहे. शरद हा गावातील अंगणवाडी जवळच्या बाकावर झोपलाहोता. उठवण्यासाठी त्याच्या डोक्यावर लहानुने मारले. यावरून शरद व लहानू यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणादरम्यान शरदने लहानूच्या डोक्यावर काठीने जोरदार वार केला. त्यात लहानू जागीच ठार झाला. चामोर्शीचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, तुषार पाटील यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आले...