दोन दिवसात होणार रस्त्यांचे काम - सरपंच यांचे आश्वासन* *मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात सरपंचांना निवेदन


 
देसाईगंज/कुरुड वार्ता..
                आज दिनांक १९ ला कुरुड ग्रामपंचायत कार्यालय येथे गेल्या कित्येक दिवसांपासून रोडाची दुरावस्था झालेली आहे या रोडाच्या दूर अवस्थेमुळे शालेय मुला-मुलींना आणि नागरिकांना देण्या जाण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे. खूप दिवसांपासून गावातील नाल्या उपासां त्याचप्रमाणे त्यांच्यावरील झाकण उघडले गेलेले नाही यामुळे पावसाळ्यामध्ये सतावत असलेल्या साथीच्या रोगांना आमंत्रण गावातील नागरिक देत आहेत त्यामुळे गावातील नाल्या रोड त्याचप्रमाणे स्वच्छतेकडे लवकरात लवकर या स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनोज ढोरे तथा समस्त ग्रामावशी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केलेला आहे. अनेक समस्याचे निवेदन मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात सरपंच सौ प्रशाला अविनाश गेडाम यांनी सुपूर्द करण्यात आले. त्यावर सरपंच सौ. गेडाम यांनी येत्या दोन रस्त्यांवरील खड्डे भुजविणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच इतरही समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
           यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय चलाख, ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,गावातील नागरिक विलास गोटेफोडे,अतुल फटीग, ईश्वर ढोरे, दीपक भागडकर,धनपाल खरकाटे,राजेश मेश्राम आणि समस्त कुरुड वाशी सुज्ञ नागरीक उपस्थित होते