भद्रावती तालुक्यातील मांजरी पोलीस ठाणे अंतर्गत माजरी येथे एका ६० वर्ष वय आसलेल्या सासऱ्याने आपल्या २२ वर्षीय सूनेवर घरी कोणीच नसताना रात्रीच्या बारा वाजे सुमारास नऊ जुलैला अत्याचार केल्याची घटना घडली सुनेने भीती आणि बदनामी च्या पोटी कुठेही घडलेल्या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र सासऱ्याकडून पीडीतेला वारंवार धमक्याचा भडीमार होत असल्याने अखेर पीडित सूनेनी माजरी पोलीस ठाण्यात जाऊन शनिवार रोजी तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडीताचे लग्न 2019 मध्ये झाले घरामध्ये नवरा दिर आणि सासरा सासू असे लोक राहतात. मात्र घरातील नवरा आणि दीर रात्र ड्युटीला कामावर जात असल्याने आणि सासू नेहमी बिमार असल्याने या संधीचा फायदा घेत सासऱ्याने ९ जुलै रोजी रात्रौ १२ वाजेच्या सुमारास टीव्हीचा आवाज वाढवून सुनेला चाकूचा धाक दाखवत सुनेवर अत्याचार केला
. मात्र थोडीफार हिम्मत दाखवून सुनेने माजरी पोलीस स्टेशन गाठले आणि १५ जुलैला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नात्याला कलंक लावणारी घटना असल्याने माजरी येथे या घटनेमुळे पूर्णतः खळबळ उडाली आहे तक्रारी दरम्यान पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी सासऱ्या विरुद्ध कलम ३७६/२ व भारतीय दंड( फ) अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी सासऱ्याला अटक केली पुढील तपास उपविभागी पोलीस अधिकारी ,ठाण्याचे ठाणेदार करीत आहेत