अहेरी : . स्कॉर्पिओची दुचाकीला बसल्याने दुचाकीवरील तीन युवक जखमी झाल्याची घटना अहेरी- महागाव मार्गावर रविवारला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. संकेत कोंडरा, निखिल कोंडरा, प्रकाश मुलकरी रा. अहेरी अशी जखमी युवकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अहेरीवरून महागावकडे जाणा-या एका स्कॉर्पिओ वाहनाने त्याच मार्गाने जाणा-या दुचाकीस्वार युवकांना जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी अनियंत्रित होवून तीनही युवक खाली कोसळले यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच अरुण सराफवार, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक मुधोळकर, सोहिल वाळके, दुलेश मैलारपवार यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. संजय उमाटे यांनी त्यांच्यावर उपचार केले. अपघात घडताच सदर स्कॉर्पिओ चालक वाहन घेवून फरार झाला. पोलिस निरीक्षक किशोर मानभाव
मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चव्हाण सदर स्कॉर्पिओचा शोध घेत आहेत. धडक दिलेली स्कॉर्पिओ कुणाची, याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलिस विभाग शहरातील सीसीटीव्ही तपासून अज्ञात स्कॉर्पिओ वाहनाचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, नुकतेच अहेरी येथे सत्र न्यायालयाचे लोकार्पण पार पडले. ज्याची तयारी म्हणून अहेरी ते इंडियन पॅलेस फंक्शन हाल या रस्त्यावरील खड्डे गिट्टी टाकून बुजवण्यात आले. मात्र खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली यांच्या गिट्टी अपघातास कारणीभूत ठरत आहे.