गडचिरोली : आसाम कनेक्शन राज्यातील गुवाहाटी येथे वाघाच्या कातडी व हाडांसह अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाघ शिकार प्रकरणातील आरोपी गडचिरोली जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर-गडचिरोली वनवृत्ताची एक संयुक्त टीम गठीत करून आज गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी येथे गडचिरोली पोलिसांच्या मदतीने 6 पुरुष, 5 महिला व 5 लहान मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईदरम्यान राहत्या झोपड्यांमधून वाघाच्या शिकारीकरीता वापरण्यात येणारे 6 नग शिंकजे, इतर धारदार शस्त्रे, वाघाची 3 नखे व 46 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. तसेच संशयितांकडून प्राप्त माहितीच्या आधारे करीमनगर, तेलंगाणा व महाराष्ट्रातील धुळे येथून सुद्धा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सर्व संशयित हरयाणा व पंजाब राज्यातील निवासी असल्याचे सिद्ध झाले आहे आहे. सदर आरोपींचा आसा येज्ञे पकडण्यात आलेल्या शिकार प्रकरणी तसेच देशातील विविध भागातील शिकार प्रकरणात समावेश असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. सदर प्रकरणाच्या चौकशरीकता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व गडचिरोली वनवृत्तातील अधिका-यांचा समावेश असलेली स्पेशल टॉस्क फोर्स (विशेष कार्य दल) गठीत करण्यात आले आहे. तसेच गडचिरोलीचे सहाय्यक वनसंरक्षक यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती सर्व संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवि असून पुढील तपास सुरु आहे. या कारवाईमुळे गडचिरोली व चंद्रपूर तसेच तेलंगाणा राज्यात वाघांची शिकार करण्याचा परप्रांतीय टोळीचा मोठा कट विफल करण्यात यश मिळाले आहे.