🧐 तुम्हाला माहिती असेल, अनेक वेळा आपण फोटो काढले की कोणाला सेंड करायचे किंवा स्टेटस पोस्ट करायचे असल्यास ते व्हॉट्सॲपवरून करतो.
📲 पण फोटो पाठवताना त्याची क्वालिटी किंवा साईझ कंप्रेस होते. मात्र आता या त्रासापासून तुमची सुटका करणार आहे.
💁♀️ *पहा कसे असेल नवीन फीचर्स*
✍️ WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲपने ‘HD फोटो ‘ हे जबरदस्त फिचर आणले आहे. हे फिचर iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही यूजर्ससाठी लॉंच करण्यात येणार आहे.
💫 तुम्हाला माहिती असेल, यापुर्वी फोटो पाठवताना त्याची साईझ किंवा क्वालिटी कंप्रेस होत असल्याने युजर्स समाधानी नव्हते. मात्र या फीचरच्या मदतीने लवकरच तुम्ही पाठवलेले किंवा पोस्ट केलेले फोटो HD क्वालिटीमध्ये समोरच्या व्यक्तीला दिसणार आहेत.
📍 याशिवाय व्हॉट्सअॅप बिझनेसवर Status Archive हे फिचर देखील येणार आहे ज्यामुळे वापरकर्ते आपल्या स्टेटसला 30 दिवसांसाठी Archive करू शकणार आहेत. हे फीचर इंस्टाग्राम स्टोरीसारखे असणार आहे जिथे यूजर्सना स्टोरी Archive करण्याचा पर्याय मिळेल.