खळबळजनक.. ३ मुलांच्या बापाने मित्राच्या पत्नीला नेले पळवून, महिलेनेही प्रियकरासाठी ८ मुलांना वाऱ्यावर सोडले


म्हणतात ना प्रेम आंधळं असतं.

प्रेमात जाती-पाती, धर्म, रितीरिवाज , गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव पाळला जात नाही.
याबरोबरच प्रेमात पडलेले लोक कोणतीही नैतिकता पाळत नाहीत, असे प्रकार नेहमी समोर येत असतात.
त्याचबरोबर कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही.
अशीच एक खळबळजनक घटना उत्तरप्रदेशमधील संभल मध्ये समोर आली आहे.संभलच्या हजरतनगर गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आठ मुलांची आई तिच्या नवऱ्याच्या मित्रासोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
पत्नीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी महिलेच्या पतीने प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका तरुणाचा विवाह डिडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीसोबत २००४ साली झाला होता.

तरुणाचे नाव राज असं असून तो गवंडी काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो.
लग्नानंतर त्यांना आठ मुलं झाली.
जोडप्याला सहा मुली आणि दोन मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे.राजला आपल्या कामात एका मजुराची गरज होती, त्यासाठी तो गावातील एका तरुणाला बोलवायचा.

तो तरुण राजचा मित्र देखील होता.
याच दरम्यान राजची पत्नी आणि मजूर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
मजुराचे घरी येणे जाणे वाढले.

त्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले आणि संधी मिळताच पळून गेले.पत्नी बेपत्ता झाल्यानंतर राजने व तिच्या मुलांनी सर्वप्रथम नातेवाईक व गावात शोध घेतला, मात्र ती महिला कुठेच सापडली नाही.
ती गावात राहणाऱ्या पतीच्या मित्रासोबत पळून गेल्याचे समोर आलं.
महिला ज्या व्यक्तीसोबत गेली आहे तो तीन मुलांचा बापआहे.
आपल्या मुलांना सोडून गेलेल्या या दोघांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.