उपविभागीय अधिकारीसह दोन तहसीलदार निलंबित


भंडारा : जिल्ह्यातील भंडारा उपविभागातंर्गत येत असलेल्या भंडारा व पवनी तालुक्यातील पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत त्रुट्या आढळून आल्याने विभागीय आयुक्तांच्या सुचनेवरून पालघर येथील विद्यमान रोहयो उपजिल्हाधिकारी व भंडाराचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठाडे यांच्यासह भंडारा तहसिलदार अरविंद हिंगे व पवनीच्या तत्कालीन तहसिलदार निलिमा रंगारी यांना निलबिंत करण्यात आले आहे. महसुल व वनविभागाचे अवर सचिव संजीव राणे यांच्या स्वाक्षरीने 27 जून रोजी निलबंनाचे आदेश काढण्यात आले. यामध्ये भंडारा उपविभागीय अधिकारी कार्यालयातंर्गत झालेल्या पोलीस पाटील भरतीमध्ये अनियमिततेसंदर्भात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी भंडारा प्राथमिक चौकशी केली असता या चौकशीत तक्रारीत तथ्य आल्याचे 20 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या अहवालात म्हटले गेले. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियमअंतर्गत तत्कालीन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठौड़, भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे आणि पवनीचे तत्कालिन तहसीलदार नीलिमा रंगारी यांना निलंबित करण्यात आले आहे. निलबिंत काळात त्यांचे मुख्यालय पालघर, भंडारा व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय निश्चित करण्यात आले आहे