आरमोरी पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या आवळल्या मुसक्या



विविध ठिकाणच्या धाडीत पाच आरोपींना अटक

आरमोरी:  आरमोरी तालुक्यातील मुख्यालय आरमोरी व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्यांची वाढती संख्या व पाहिजे त्या प्रमाणात देशी व विदेशी दारू मिळत असल्यामुळे या अवैध व्यवसायिकाविरोधात आरमोरी पोलिसांनी कंबर कसली असून सलग तीन दिवसात पाच दारू विक्रेत्यांना गजाआड केले. त्यांच्याकडून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

५ जून रोजी आरमोरी येथील इंदीरानगरातील राहूल कैलास टेंभुर्णे (३८) याच्याघरी धाड टाकुन १६,८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ०६ जून रोजी वैरागड येथील बादल तुळशिदास गिरीपुंजे याच्याकडून एमएच MH-33-Z-6194 क्रमांकाची ४० हजार रूपयांची दुचाकी व २७०० रूपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. याच दिवशा वासाळा येथील मारोती यादवराव पात्रीकर (३०) व लोमेश्वर बाबुराव भोयर (३३) यांच्याकडून वैरागड ते वासाळा फाटा येथे होन्डा कंपनिची CB शाईन मो.सा.क... MH-33-AE-3532 क्रमांकाची ५० हजार रूपये किमतीची मोटारसायकल, १० हजार रूपये किमतीची दारू, १० हजार रूपये किमतीचा मोबाईल असा ७०,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला.

याच दिवशी वैरागड येथील संदीप श्रीरंग पात्रीकर (३४) सर्व याच्या शेतातून ४ हजार रूपये किमतीची दारू व १० हजार रूपये किमतीचा मोबाईल जप्त केला.

आज ६ जून रोजी वैरागड येथील शुभ्रमणी कालीदास गजभिये (३३) व त्याची पत्नी मनस्वी शुभ्रमणी गजभिये (२२) यांच्याताब्यातील ९० हजार रूपये किमतीची शाईन मो.सा. क.

लाल रंगाची मोटारसायकल, १२ हजार रूपये किमतीची विदेशी दारू, ५७०० रूपये किमतीची देशी दारू, १० हजार रूपये किमतीचा मोबाईल असा १,१७,७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकुण १) अवैध विदेशीदारू ०२ लिटर क्षमतेची रॉयल स्टॅग कंपनीच्या ०५ नग विदेशी दारूच्या बॉटला २) अवैध देशीदारू ९० मिली मापाच्या ३७५ नग बॉटला, ३) हातभट्टी मोहादारू ७० लिटर

सर्व आरोपीकडून २,४८,६०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर मुंबई दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुनघाटे, पो.उपनिरीक्षक झिंझुर्डे, पोलीस उपनिरीक्षक कालकुरे, पोलीस उपनिरीक्षक बिल्हारी करीत आहेत.