मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये उकळले
मुंबई (Mumbai) : मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील हत्येच प्रकरण शांत होत नाही तोच, आता आणखी दुसर भयंकर प्रकरण समोर आले. मुंबईतील मीरा रोड परिसरातील आकाशगंगा सोसायटीत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्याने मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळले.


मात्र, त्याच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे जप्त केले आहेत. ती सोसायटीतील तिच्या एका मित्रा सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. नंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आल्याचे समोर आले.

– मृतदेह कुकरमध्ये उकळला :
डीसीपी जयंत बजबळे यांनी सांगितले की, 32 वर्षीय सरस्वती वैद्य असे मृताचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती तिचा ५६ वर्षीय मित्र मनोज साहनी याच्यासोबत आकाशगंगा सोसायटीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून महिलेचा विकृत मृतदेह बाहेर काढला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले. दुर्गंधी पसरू नये म्हणून आरोपींनी मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळले. असे असतानाही विचित्र वासाने शेजाऱ्यांना मात्र त्रास झाला, त्यामुळे पोलिसांत तक्रार केली.


माहिती मिळताच पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहाचे तुकडेही जप्त केले आहेत. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून फ्लॅटमधून इतर पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येईल. पोलिसांनी फ्लॅट सील केला आहे.

पोलिसांनी मृताच्या साथीदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना संशय आहे की महिलेच्या पार्टनरने तिची निर्घृण हत्या केली आहे. धारदार चाकूने मृतदेह कापण्यात आला. लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मृताच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.