अल्पवयीन मुलीसोबत ‘ इलू इलू ‘ , बायको पळून गेलेली म्हणून रूमवर आणलं पण..


महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सांगली जिल्ह्यातील मिरज इथे समोर आलेली असून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरज येथे आणल्यानंतर बलात्कार करून तिचा गळा कापून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ब्राह्मणपुरी येथील ही घटना आहे . मिरज शहर पोलिसात आरोपीच्या विरोधात बलात्कार खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र आरोपी फरार झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रसाद शिवाजी मोटूगडे ( वय २४ राहणार ब्राह्मणपुरी तालुका मिरज ) असे याप्रकरणी आरोपीचे नाव असून त्याची सांगली शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेली होती. 30 मे रोजी त्याने दुपारी साडेबाराच्या सुमारास सांगली येथे जाऊन एका रिक्षातून तिचे अपहरण केले आणि ब्राह्मणपुरी परिसरातील भाड्याने घेतलेल्या खोलीत तिला नेलेले होते.

आरोपींनी तिला तिथे घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून तिच्या उजव्या हाताची नस कापली आणि तिच्या गळ्यावर कटरने वार केले त्यामध्ये ती गंभीर जखमी झालेली आहे. पीडित मुलगी ही रक्तबंबाळ झाल्यानंतर आरोपी याने तात्काळ तिथून पलायन केले. पोलिसांना या घटनेची माहिती समजली आणि तात्काळ पोलिसांनी धाव घेत या मुलीला रुग्णालयात दाखल केलेले आहे.पोलीस तपासात आत्तापर्यंत आरोपी प्रसाद मोटूगडे हा विवाहित असल्याची माहिती समोर आलेली असून त्याला वेगवेगळ्या प्रकारची व्यसने आहेत त्यामुळे त्याची पत्नी देखील त्याला सोडून गेलेली आहे अशी ही माहिती समोर आलेली आहे . अल्पवयीन मुलीचे अपहरण बलात्कार आणि तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.