समाजकार्याच्या चार रक्तवीरांनी हैद्राबाद येथे जाऊन केले रक्तदानचंद्रपूर येथील निखिल भडकेची सामाजिक बांधिलकी
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील निखिल भडके याचा मित्र सागर कातकर याचा भाऊ बंडू सोनटक्के वय 45 यांना ब्यानबोरो ट्रान्सलेट च्या अजारकरिता रक्तची गरज भासली. निखिल भडके हा चंद्रपूर मध्ये समाजकार्याचा अभ्यासक्रम पदवी शिक्षण घेत आहे. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू रुग्णांना रक्ताचा गरज असली की उपलब्ध करुन देतो. आणि बंडू सोनटक्के यांच्यासाठी रक्त पाहिजे आणि ते सुध्दा हैद्राबाद मध्ये रक्तदाते घेऊन जायचे आहे. असा निखिल ला मित्राचा फोन आला. आणि रक्तदाते शोधण्यास निखिल ने धडपडीने सुरवात केली. सिंडेवाही तालुक्यातील चार रक्तदाते बोलावले. त्यांना जाण्या येण्याचा आणि सोबतच चार ते पाच दिवस तिथे मुक्कामी राहण्याची त्यांची सगळी काळजी घेता.
बंडू सोनटक्के यांच्यासाठी एक माणुसकीच्या नात्याने सर्वांनी रक्तदानासाठी तयार होते. योगायोग की बंडू सोनटक्के यांना फक्त एक बॉटल रक्ताचा गरज पडली आणि यशस्वीरित्या चंद्रपूर ते हैद्राबाद असा विद्यार्थांचा प्रवास यशस्वी झाला.
हैद्राबाद मधील यशोदा हॉस्पिटल मध्ये ब्यानबोरो ट्रान्सलेट ची शत्रक्रिया यशस्वी झाली आणि रक्तदाते आपला अनुभव सांगताना स्वतः सांगितले की बंडू भाऊ ला एक नविन आयुष्य जगण्याची संधी मिळाली. बंडू सोनटक्के यांनी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले आणि यशोदा हॉस्पिटल हैदराबाद येथून येत्या काही दिवसात ते बरे होऊन चंद्रपुरात येथिल. रक्तदान हि श्रेष्ठदान सहकरी मित्र सागर कातकर. कारण गायकवाड. छगन वसाके. यांनी सर्वांनी मदत केली.